घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: मृतांचा आकडा पुन्हा वाढला; ९६० कोरोनाबाधितांचा मृत्यू 

Maharashtra Corona Update: मृतांचा आकडा पुन्हा वाढला; ९६० कोरोनाबाधितांचा मृत्यू 

Subscribe

एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढलेला दिसला. शुक्रवारी राज्यात ६९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी राज्यात ९६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ८० हजार ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र घट झालेली पाहायला मिळाली. शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. हा आकडा शुक्रवारी ४२ हजारच्या पार होता.

५९ हजारहून अधिक रुग्ण बरे

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज राज्यात ५९ हजार ०७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२० टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

४ लाख ९४ हजार ०३२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ४४ हजार ०६३ वर पोहोचली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ९४ हजार ०३२ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०८,३९,४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,४४,०६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,४७,६५३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २८,७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -