Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३५९ नव्या रुग्णांची वाढ; मार्च महिन्यात तिसऱ्यांदा आज एकही मृत्यूची नोंद नाही

Maharashtra Corona Update 359 new corona patient found and no patient deaths have been reported in 24 hours
Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३५९ नव्या रुग्णांची वाढ; मार्च महिन्यात तिसऱ्यांदा आज एकही मृत्यूची नोंद नाही

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल, मंगळवारी राज्यात 460 नवे कोरोनाबाधित आढळले होते, तर 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. पण आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 359 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये. यापूर्वी 7 मार्च आणि 2 मार्चला एकाही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 857वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 हजार 9 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

आज दिवसभरात राज्यातील ५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 19 हजार 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 857 (10.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 हजार 116 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात आज कोरोनाचे 4 हजार 575 नवे रुग्ण आढळून आले तर 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार केला असता, मंगळवारी देशात 3 हजार 993 रुग्ण आढळले होते तर 108 मृत्यूची नोंद झाली होती. त्यामुळे कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आज सक्रिय रुग्णांची संख्या 46 हजार 962 इतकी कमी झाली आहे.


हेही वाचा – Russia Ukraine war: युद्ध रशिया आणि युक्रेनचं पण भारताच्या डोक्याला ताप, ही आहेत कारणे