Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासात रुग्णसंख्येत घट, केवळ ३ जणांचा मृत्यू

आज राज्यात ६८८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ७७ लाख १७ हजार ३६२ इतकी आहे. तर राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०८ टक्के इतका आहे.

Maharashtra Corona Update 362 new corona positive patients found and 3 death in last 24 hours in state
Maharashtra Corona Update :राज्यात २४ तासात रुग्णसंख्येत घट, केवळ ३ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. कालच्या तुलनेत आज राज्यातील रुग्णसंख्येत दोनशेने घट झाली आहे. मागील २४ तासात राज्यात ३६२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ५३५ इतकी होती. त्याचप्रमाणे राज्यातील मृत्यूदर हा शून्यावर आला असून आज राज्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज राज्यात ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हाच आकडा १० इतका होता. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे.

राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज राज्यात ६८८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ७७ लाख १७ हजार ३६२ इतकी आहे. तर राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०८ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या २६ हजार २९१ व्यक्ती या होम क्वारंटाईन असून ५८७ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या ३ हजार ७०९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पाहा राज्यनिहाय अँक्टिव्ह रुग्णांचा तपशील.

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५५९९७ १०३५९२५ १६६९२ २८६१ ५१९
ठाणे ७६६२८८ ७५४०६० ११८६८ ३५ ३२५
पालघर १६३४२३ १५९९६५ ३३९२ १५ ५१
रायगड २४४१८७ २३९१५२ ४९३६ ९२
रत्नागिरी ८४३९१ ८१८३४ २५४१ ११
सिंधुदुर्ग ५७१३९ ५५५२४ १५११ १५ ८९
पुणे १४५०९३४ १४२९१०९ २०१५७ ३५० १३१८
सातारा २७८०९३ २७१३०६ ६६७५ ३४ ७८
सांगली २२६९७० २२१२८० ५६५५ २६
१० कोल्हापूर २२०४२० २१४४७३ ५८९९ ४३
११ सोलापूर २२६९७९ २२१०४९ ५७५९ ११७ ५४
१२ नाशिक ४७२६६७ ४६३५३७ ८९०४ २२५
१३ अहमदनगर ३७७०६४ ३६९४७० ७२२९ ११ ३५४
१४ जळगाव १४९४६३ १४६६८८ २७२८ ३३ १४
१५ नंदूरबार ४६५९८ ४५६१५ ९५९ २१
१६ धुळे ५०६५९ ४९९८५ ६५९ ११
१७ औरंगाबाद १७६३०३ १७१९४८ ४२७० १४ ७१
१८ जालना ६६३०१ ६५०७३ १२२३
१९ बीड १०९०७६ १०६१६५ २८७४ ३०
२० लातूर १०४८९० १०२३८८ २४८३ १३
२१ परभणी ५८५१४ ५७२२२ १२५६ २० १६
२२ हिंगोली २२१६४ २१६४८ ५१३
२३ नांदेड १०२६३४ ९९९१३ २६९६ १८
२४ उस्मानाबाद ७५०९९ ७२९४४ २०२३ ११६ १६
२५ अमरावती १०५९१२ १०४२७९ १६२२
२६ अकोला ६६१४५ ६४६६१ १४६४ १६
२७ वाशिम ४५६०३ ४४९५१ ६३८ ११
२८ बुलढाणा ९१८२३ ९०९६१ ८१७ ३९
२९ यवतमाळ ८१९७५ ८०१४८ १८१६
३० नागपूर ५७६२३७ ५६६८५५ ९१४३ ७१ १६८
३१ वर्धा ६५६६० ६४२४४ १२३७ १७१
३२ भंडारा ६७९२४ ६६७७० ११३२ १० १२
३३ गोंदिया ४५३९८ ४४८०८ ५८०
३४ चंद्रपूर ९८८०० ९७१९९ १५८७ १०
३५ गडचिरोली ३६९३९ ३६१८२ ६९१ ३४ ३२
  इतर राज्ये/ देश १४४ ३१ १११
  एकूण ७८६८८१३ ७७१७३६२ १४३७४० ४००२ ३७०९

 

राज्यात मागील २४ तासात ६१ ओमिक्रॉन बाधित रुग्ण देखील आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण बी.जे. वैद्यकीय महाविद्यालाकडून रिपोर्ट करण्यात आले आहेत. आज आढळलेल्या ६१ रुग्णांपैकी ४४ रुग्ण हे पुणे मनपा येथील आहेत. तर ८ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा येथील तर पुणे ग्रामीण येथून ९ रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत ५ हजार ७२६ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – Coronavirus Cases Today: देशात 24 तासांत 5,476 नव्या रुग्णांची वाढ; 59,442 कोरोनाचे सक्रिय रुग्ण