घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: टेन्शन वाढले! राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या १ लाख पार; २४...

Maharashtra Corona Update: टेन्शन वाढले! राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या १ लाख पार; २४ तासांत ३६,२६५ रुग्णांची भर

Subscribe

गेल्या २४ तासांत राज्यात ७९ नवीन ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ८७६वर पोहोचली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचे टेन्शन वाढताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या लाखोपार गेली आहे. त्यामुळे राज्यातील चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात राज्यातील ८ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७ लाख ९३ हजार २९७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ५९४ जणांचा मृत्यू झाला असून ६५ लाख ३३ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ लाख १४ हजार ८४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६.१७ टक्के झाला असून मृत्यूदर २.०८ टक्के आहे.

राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती…

एकाबाजूला राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉनबाधितांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७९ नवीन ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ८७६वर पोहोचली असून ३८१ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात आज सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत.

- Advertisement -

आज कुठे-कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण आढळले?

मुंबई – ५७ रुग्ण
ठाणे मनपा – ७ रुग्ण
नागपूर – ६ रुग्ण
पुणे मनपा – ५ रुग्ण
पुणे ग्रामीण – ३ रुग्ण
पिंपरी-चिंचवड – १ रुग्ण


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत लॉकडाऊन अटळ; दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -