घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: मृतांचा आकडा घटला; ३९ हजार ९२३ नवे रुग्ण

Maharashtra Corona Update: मृतांचा आकडा घटला; ३९ हजार ९२३ नवे रुग्ण

Subscribe

आज ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ४२ हजार ५८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. शुक्रवारी हा आकडा कमी झालेला दिसला. शुक्रवारी ३९ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ९ हजार २१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख १९ हजार २५४ वर पोहोचली आहे. तसेच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी मृतांच्या आकड्यातही घट झालेली दिसली. गुरुवारी ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी ६९५ मृतांची नोंद झाली.

राज्यात ६९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज ६९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७९ हजार ५५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५० टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,८२,४२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २८,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

५३ हजारहून अधिक रुग्ण बरे 

कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी होत असतानाच राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. आज ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के एवढे झाले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -