Maharashtra Corona Update: राज्यात शनिवारी 42,462 कोरोनाचे नवे रुग्ण, 23 मृत्यू तर 125 ओमिक्रॉन बाधित

राज्यात आज 39,646 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 67 लाख 60 हजार 514 इतकी आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 94.28टक्के इतका आहे.

Maharashtra Corona Update 42,462 Corona positive and 125 omicron positive patients found in state today 23 death

राज्यात आज कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या किंचित कमी झाली. राज्यात मागली 24 तासात 42,462 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आजची आकडेवारी ही एक हजारांनी कमी झाली आहे. काल राज्यात 43,211 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आज शनिवारी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात खाली आली असली तरी मृत्यू संख्या वाढली आहे. राज्यात आज 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हिच संख्या 19 इतकी होती. आज यात चारने वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे राज्यात आज 39,646 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 67 लाख 60 हजार 514 इतकी आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 94.28टक्के इतका आहे. राज्यात सध्या 22 लाख 108 रुग्ण हे होम क्वारंटाइनमध्ये आहेत.तर 6 हजार 102 रुग्ण हे व्यक्तिगत क्वारंटाइन आहेत.

राज्यात आज ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात आज 125 नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. काल हीच संख्या दुप्पट होती. शुक्रवारी राज्यात 238 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली होती. राज्यात आज नोंद करण्यात आलेल्या ओमिक्रॉन बाधितांपैकी नागूपरमधील 39 रुग्ण आहेत. मुंबईत आज 24 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली.

तर मिरा भाईंदरमधील 20, अमरावतीत 9, अकोल्यात 5 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे पीसीएमसीला 3, औरंगाबाद,जालना,पुणे आणि अहमदनगर येथील प्रत्येकी 2 रुग्ण आहे आणि नाशिक, कोल्हापूर, लातूर,सातारा, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 1 ओमिक्रॉन रुग्ण आढळून आला आहे. मुंबईत आतापर्यंत 653 ओमिक्रॉबाधित रुग्ण आढळेत तर पुण्यात 537.


हेही वाचा –  Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण आज १ हजारांनी कमी झाले पण मृत्यू संख्या वाढली