घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Maharashtra Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Subscribe

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ६२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४७ लाख ७१ हजार २२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७० हजार ८५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ५६ हजार ८७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान आज दिवसभरात राज्यात ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. तसेच आज नोंद झालेल्या एकूण ५६७ मृत्यूंपैकी २८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३८ मृत्यू, ठाणे-४९, औरंगाबाद-२२, कोल्हापूर-१७, नागपूर-८, अहमदनगर-७, जळगाव-७, रायगड-७, वाशिम-५, नांदेड-३, पुणे-३, सोलापूर-३, नाशिक-२, सांगली-२, बीड-१, पालघर-१ आणि परभणी-१ असे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७८ लाख ६४ हजार ४२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७ लाख ७१ हजार २२ (१७.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ८ हजार ४९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील १२ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागील १५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या प्रकरणात घट दिसून आली आहे. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, वाशिम, नंदूरबार, औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातून, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोना आलेख उतरता दिसत आहे.


हेही वाचा – Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बालरोग कोविड केअर वार्ड उभारणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -