घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ८२,२६६ रुग्ण कोरोनामुक्त, तर ८६४ जण...

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ८२,२६६ रुग्ण कोरोनामुक्त, तर ८६४ जण मृत्यूमुखी

Subscribe

राज्यात एकाबाजूला कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, पण दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. मागील २४ तासांत राज्यात ५३ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ८६४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख ५३ हजार ३३६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७५ हजार २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ८२ हजार २६६ रुग्ण बरे होऊन घरी असून आजपर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

दरम्यान राज्यात आज नोंद झालेल्या एकूण ८६४ मृत्यूंपैकी ३९९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३९ मृत्यू, औरंगाबाद-७८, नागपूर-२६, नाशिक-२१, ठाणे-२१, अहमदनगर-१९, यवतमाळ-११, सातारा-९, परभणी-८, नांदेड-७, गडचिरोली-६, पुणे-५, चंद्रपूर-४, सांगली-४, धुळे-३, जालना-३, उस्मानाबाद-३, भंडारा-२, कोल्हापूर-२, रत्नागिरी-२, सोलापूर-२, गोंदिया-१, जळगाव-१ आणि रायगड-१ असे आहेत. तसेच आज राज्यातील कोविड १९ रुग्णांच्या आकडेवारीचे दि. २० एप्रिल २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलेशन पूर्ण करण्यात आले आहे. सध्या राज्यात ६ लाख २८ हजार २१३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९१ लाख ९४ हजार ३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५० लाख ५३ हजार ३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ५० हजार ५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ लाख ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासा! कोरोना रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -