घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येच्या आलेखात चढ उतार! २४ तासांत मृत्यूचा आकडा...

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येच्या आलेखात चढ उतार! २४ तासांत मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा

Subscribe

काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. आज राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात ५४ हजार २२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८९८ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४९ लाख ९६ हजार ७५८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७४ हजार ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज नोंद झालेल्या एकूण ८९८ मृत्यूंपैकी ३८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१४ मृत्यू, नाशिक- ९७, नागपूर- ४१, पुणे-२९, औरंगाबाद- २५, ठाणे- २२, धुळे- १५, रायगड- १२, नांदेड- १०, गोंदिया- ८, सोलापूर- ८, चंद्रपूर- ७, भंडारा- ६, बुलढाणा- ६, परभणी- ६, जालना- ४, बीड- ३, गडचिरोली- ३, सांगली- ३, जळगाव- २, रत्नागिरी- २, कोल्हापूर- १, लातूर- १, उस्मानाबाद- १, सिंधुदुर्ग- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत. सध्या राज्यात ६ लाख ५४ हजार ७८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८९ लाख ३० हजार ५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ९६ हजार ७५८ (१७.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ४१ हजार ४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: गेल्या दोन आठवड्यात कोणत्या जिल्ह्यात रुग्ण वाढले, कुठे घट? केंद्राने दिली माहिती

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -