घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम, २४ तासांत ५,४५५ नव्या...

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम, २४ तासांत ५,४५५ नव्या रुग्णांची वाढ, ६३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज ७६ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहेत. आज पुणे मनाप क्षेत्रात सर्वाधित ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे.

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येतील घट कायम आहे. राज्यात आज ६ हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ४५५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ३५ हजार ८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ९०२ सक्रीय रुग्ण आहेत.

आज दिवसभरात १४ हजार ६३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ७६ लाख २६ हजार ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ६१ लाख ६९ हजार ६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ३५ हजार ८८ (१०.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १० हजार ७१८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ३९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती

राज्यात आज ७६ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आज पुणे मनपामध्ये ४६, अमरावतीमध्ये १२, जालनामध्ये ८, पुणे ग्रामीणमध्ये ४, वर्ध्यात ३, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात १ प्रत्येकी ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३ हजार ५३१ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी २ हजार ३५३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८ हजार ५६८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी ७ हजार २६२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १ हजार ३०६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.


हेही वाचा – Omicron Variant: बापरे! ओमिक्रॉनच्या फैलावानंतर जगात ५ लाख लोकांचा मृत्यू!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -