घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: राज्यात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात सध्या ६ लाख १२ हजार ७० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यातील रुग्णसंख्या मंगळवारी ६० हजारांच्या पार गेली होती. आज राज्यात ५८ हजारर ९५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात करण्यात आलेल्या १५ दिवसांच्या लॉकडानच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात आज २७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा १.६४ टक्के इतका आहे. राज्यात सध्या ६ लाख १२ हजार ७० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर हा ८१. २१ टक्के इतका आहे. आज राज्यात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत रुग्ण बरे होण्याची संख्या २९ लाख ५ हजार ७२१ इतकी झाली आहे. राज्यात कोरोना चाचण्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी २८ लाख २ हजार २०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३५ लाख ७८ हजार १६० कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. असे असले तरी राज्यात सध्या ३४ लाख ५५ हजार २०६ लोक हे होमक्वारंटाईन आहेत. तर २८ हजार ४९४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात करण्यात आलेल्या १५ दिवसांच्या लॉकडाऊमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ५ जणांपेक्षा अधिक लोकांनी फिरण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी २२ हजार होमगार्ड आणि एसआरपीएफ पथक सज्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी घरा बाहेर पडा,अन्यथा कोणीही गरज नसताना घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर ब्रेक द चेनच्या अंतर्गत सरकारला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील इतर जिल्ह्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे 

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

,४५,१९५

,४५,२७२

१२,१४७

,१४१

८६,६३५

ठाणे

,२६,६०२

,३६,१४८

,३२५

३१

८४,०९८

पालघर

६५,८६९

५५,६९३

,१२४

१०

,०४२

रायगड

९६,२०४

८४,०५०

,७३८

१०,४१४

रत्नागिरी

१४,५७७

१२,३३९

४३७

,७९९

सिंधुदुर्ग

,९०८

,११५

२०८

,५८५

पुणे

,७९,३१३

,५८,४१०

,६३६

५४

,१२,२१३

सातारा

७६,२४५

६५,०६०

,९५९

,२१७

सांगली

६०,५५४

५३,५३३

,८९३

,१२६

१०

कोल्हापूर

५४,४५१

५०,२८०

,७१४

,४५४

११

सोलापूर

८०,२६७

६७,९४४

,०३९

५३

१०,२३१

१२

नाशिक

,३१,९९०

,८४,६०४

,५०५

४४,८८०

१३

अहमदनगर

,२१,३३३

,०२,०४३

,३५२

१७,९३७

१४

जळगाव

,०१,८६१

८८,०३८

,६७०

२७

१२,१२६

१५

नंदूरबार

२६,३६६

१८,८४५

३६२

,१५८

१६

धुळे

३२,४२६

२५,०२५

४०४

,९९३

१७

औरंगाबाद

,०२,९६२

८६,७५७

,५११

१४

१४,६८०

१८

जालना

३१,८०१

२४,१२०

५२६

,१५४

१९

बीड

३५,७२५

२६,४८७

७१२

,५१७

२०

लातूर

४९,०५०

३४,६०८

८१६

१३,६२२

२१

परभणी

२२,४१२

१३,१२६

४२८

११

,८४७

२२

हिंगोली

,६४२

,७००

१२३

,८१९

२३

नांदेड

६३,७९५

४८,७५५

,११६

१३,९१७

२४

उस्मानाबाद

२७,४९३

२१,८३५

६५७

१७

,९८४

२५

अमरावती

५३,४१९

४८,७३४

७०३

,९८०

२६

अकोला

३३,०४१

२९,१०४

५२४

,४०९

२७

वाशिम

२०,४२६

१७,४१५

२०७

,८०१

२८

बुलढाणा

३६,९६८

३१,७९४

३२०

,८४९

२९

यवतमाळ

३२,२००

२८,३७९

५८४

,२३३

३०

नागपूर

,०३,७६०

,३३,९६१

,३८५

४६

६५,३६८

३१

वर्धा

२८,३०१

२४,०९९

४०४

७६

,७२२

३२

भंडारा

३२,७१२

१९,३८६

३३०

१२,९९३

३३

गोंदिया

२२,६०८

१५,८४९

२१७

,५३६

३४

चंद्रपूर

३७,२३८

२८,८३९

४९९

,८९८

३५

गडचिरोली

१२,३००

१०,३७४

१२१

,७९७

इतर राज्ये/ देश

१४६

१०८

३६

एकूण

३५,७८,१६०

२९,०५,७२१

५८,८०४

,५६५

,१२,०७०


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ, रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या उंबरठ्यावर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -