घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार पार!; ८५३ जणांचा...

Maharashtra Corona Update: पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार पार!; ८५३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली. पण आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार १९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ४२ हजार ७३६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७३ हजार ५१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.५४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा असून ६ लाख ३९ हजार ७५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७५ मृत्यू, नाशिक- ९६, पुणे-५२, नांदेड-२०, ठाणे- २०, बीड- ११, बुलढाणा- ५, चंद्रपूर- ५, गडचिरोली- ५, जळगाव- ५, नागपूर- ५, रायगड- ५, सोलापूर- ५, भंडारा- ४, हिंगोली- ४, जालना-४, लातूर- ४, गोंदिया- ३, कोल्हापूर- ३, नंदूरबार- ३, वर्धा- ३, अहमदनगर- २, औरंगाबाद- २, रत्नागिरी-२, सांगली- २, अकोला- १, धुळे- १, सातारा- १, वाशिम- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८६ लाख ६१ हजार ६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ४२ हजार ७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख २६ हजार ८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Sputnik Light ने आणला कोरोनाविरोधी सिंगल डोस, लस ८० टक्के प्रभावी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -