Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; राज्यात ६३ हजार २८२ नवे कोरोनाबाधित 

Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; राज्यात ६३ हजार २८२ नवे कोरोनाबाधित 

राज्यात आज ८०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्यात ६३ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी हा आकडा वाढलेला दिसला. गुरुवारी ६६ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी हा आकडा पुन्हा ६२ हजारांवर घसरला होता. मात्र, शनिवारी हा आकडा पुन्हा थोडा वाढलेला दिसला. शनिवारी राज्यात ६३ हजार २८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ लाख ६५ हजार ७५४ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ६३ हजार ७५८ वर पोहोचली आहे.

राज्यात ८०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज ८०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६९ हजार ६१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

६१ हजारहून अधिक रुग्ण बरे

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहेत. आज ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -