Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: राज्यात ८९५ कोरोना मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा, २४ तासांत...

Maharashtra Corona Update: राज्यात ८९५ कोरोना मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा, २४ तासांत वाढले ६० हजारांहून अधिक रुग्ण

Related Story

- Advertisement -

राज्यात काल (सोमवार) नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली होती. पण आज पुन्हा एकदा कोरोनाची तिची स्थिती दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार ३५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ८९५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख १० हजार ८५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६७ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात राज्यातील ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३६ लाख ६९ हजार ५४८ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६२ लाख ५४ हजार ७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४ लाख १० हजार ८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ६४ हजार ९३६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३० हजार १४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच अजूनही ६ लाख ७२ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ! ४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद


- Advertisement -