Maharashtra Corona Update: कोरोनाचा कहर कायम! राज्यात २४ तासांत ६७ हजार रुग्णवाढ, ५६८ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update 137 corona cases registered in the state in 24 hours
Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासात १३७ कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

राज्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. हा लॉकडाऊन १ मेच्या सकाळी ७ पर्यंत असणार आहे. आता या लॉकडाऊनचा परिणाम कितपत होईल हे येत्या काळात समजले. दरम्यान गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू, यवतमाळ- २२, रायगड- १६, नागपूर- १३, नांदेड- ९, नाशिक- ८, औरंगाबाद- ७, परभणी- ५, सोलापूर- ४, ठाणे- ४, वर्धा- ४, अहमदनगर- ३, कोल्हापूर- २, जळगाव- १, नंदूरबार- १, पुणे- १ आणि सातारा- १ असे आहेत. तसेच आज दिवसभरात ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४८ लाख ९५ हजार ९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख ९४ हजार ८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७१ हजार ९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार १४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात ६ लाख ९९ हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.


हेही वाचा –  Maharashtra Lockdown 2021: विद्यापिठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार – उदय सामंत