Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: कोरोनाचा धोका कायम! राज्यात ६७,१६० नवे रुग्ण

Maharashtra Corona Update: कोरोनाचा धोका कायम! राज्यात ६७,१६० नवे रुग्ण

राज्यात आज ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून शनिवारी ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ४८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

६७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७१, रायगड २०, नाशिक ३५, अहमदनगर ३०, पुणे २२, सोलापूर ४८, सातारा २३, रत्नागिरी २५, हिंगोली ११, लातूर २९, उस्मानाबाद १२, बीड २८, नांदेड ६१, अमरावती १०, यवतमाळ २५, नागपूर ५७, वर्धा २०, भंडारा २५, गडचिरोली २२ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.

मुंबईत ५८६७ नवे रुग्ण

- Advertisement -

मुंबईत शनिवारी ५८६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६ लाख २२ हजार १४६ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -