घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट; ५१ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट; ५१ जणांचा मृत्यू

Subscribe

सोमवारी राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जवळपास दुप्पट होते.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी ९ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ लाख ०४ हजार ९१७ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८२७ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,४२,८३९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

५१ जणांचा मृत्यू   

सोमवारी कोरोनाबाधित मृतांची संख्या शंभरच्याही खाली आलेली दिसली. रविवारी १२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सोमवारी ५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २३ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

१३ हजार ०२७ रुग्ण बरे 

तसेच सोमवारी राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. आज १३ हजार ०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -