Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: मृतांचा आकडा वाढला; गेल्या २४ तासांत ६ हजार ७५३...

Maharashtra Corona Update: मृतांचा आकडा वाढला; गेल्या २४ तासांत ६ हजार ७५३ नवे रुग्ण

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार शुक्रवारीही कायम राहिला. गुरुवारी बाधित आणि मृतांच्या संख्येत घट झाली होती. शुक्रवारी बाधितांचा आकडा पुन्हा कमी झाला, पण मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी १६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार २०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६४,४६,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५१,८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

६ हजार ७५३ नव्या बाधितांची नोंद  

मृतांच्या संख्येत वाढ झाली असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांचा आकडा मात्र कमी झालेला दिसला. गुरुवारी राज्यात ८ हजार १५९ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. तर शुक्रवारी ६ हजार ७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ लाख ५१ हजार ८१० झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार ७६९ इतकी झाली आहे.

५ हजार ९७९ रुग्ण कोरोनातून बरे

- Advertisement -

तसेच गुरुवारी ७ हजाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, शुक्रवारी हा आकडा कमी होऊन ५ हजार ९७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख २२ हजार ४८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -