Maharashtra Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; १२० जणांचा मृत्यू

राज्यात ७ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

Maharashtra Corona Update 1 thousand 494 corona victims recorded in 24 hours
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात सलग दोन दिवस कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर गुरुवारी थोडा दिलासा मिळाला. गुरुवारी बाधितांप्रमाणेच मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी राज्यात ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर गुरुवारी ७ हजार ३०२ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ लाख ४५ हजार ०५७ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार १६८ इतकी झाली आहे. सध्या राज्यात ५,५१,८७२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

१२० जणांचा मृत्यू

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मृतांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी १६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर गुरुवारी राज्यात १२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार ०३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६२,६४,०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,४५,०५७ (१३.५० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

७ हजार ७५६ रुग्ण कोरोनातून बरे  

बुधवारी राज्यात ७ हजार ८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती, गुरुवारी राज्यात ७ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,१६,५०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.