Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट; ५३ मृत्यू

Maharashtra Corona Update: नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट; ५३ मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे झाले आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट असल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली. रविवारी ८ हजार ५३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ७ हजार ६०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ लाख ६५ हजार ४०२ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०८ हजार ३४३ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी १५ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,२७,७५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे झाले आहे.

५३ जणांचा मृत्यू 

सोमवारी कोरोनाबाधित मृतांची संख्या शंभरच्याही खाली आलेली दिसली. रविवारी १५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सोमवारी ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ५३ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २६ हजार ०२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

४६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 

- Advertisement -

राज्यात आज ७ हजार ६०३ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४१,८६,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,६५,४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८२,४७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -