Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आज 900 पेक्षा खाली; फक्त 4 रुग्णांचा मृत्यू

maharashtra corona update 806 new corona patients and 4 death in last 24 hrs in state
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आज 900 पेक्षा खाली: फक्त 4 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यात आज कोरोना रुग्णसंख्या हजारांवरून थेट 900 पर्यंत घसरली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. तर मृतांचा संख्या 4 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 806 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 रुग्णांचा कोरोनांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2696 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकूण 14 हजार 525 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आत्तापर्यंत 7 कोटी 85 लाख 9 हजार 237 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आजपर्यंत 1 लाख 43 हजार 586 रुग्णांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 97 हजार 135 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची सातत्याने घसरत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.

राज्यात सध्या 1 लाख 76 हजार 378 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1036 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत 7 कोटी 72 लाख 89 हजार 104 कोरोना चाचण्या झाल्या आहेत यातील 78 लाख 59 हजार 237 चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह चाचण्याचे प्रमाण 10.17 टक्के झाले आहे.

राज्यात आज 53 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात पुण्यात 31, अहमदनगर 19, पुणे ग्रामीण 2, लातूर 1 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 4 हजार 509 ओमिक्रॉनबाधितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 3 हजार 994 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. एकूण 8 हजार 904 चाचण्या करण्यात आल्या होत्या यातील 8 हजार 044 अहवाप प्राप्त झाले आहेत तर 860 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित राहिले आहेत.


12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी Corbevax Vaccine ला DCGI ची मंजुरी