घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत...

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट

Subscribe

राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव अजूनही वाढताना दिसत आहे. काल, गुरुवारी राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. पण आज राज्यात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ७५३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १५६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७९ हजार ३५२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २२ हजार ३५३ मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ८ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

आज ८ हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी असून आजपर्यंत एकूण ५८ लाख ३६ हजार ९२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी २० लाख ९६ हजार ५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ७९ हजार ३५२ (१४.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २४ हजार ७४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Delta Variant: १२ राज्यांमध्ये आढळले डेल्टा व्हेरियंटचे ५६ रुग्ण – डॉ. वीके पॉल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -