घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्या घटली पण मृत्यूंच्या संख्येत वाढ

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्या घटली पण मृत्यूंच्या संख्येत वाढ

Subscribe

राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९,६३,४२० तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,३२,५९७ इतकी झाली आहे. राज्यात शनिवारी २५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,१७,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के एवढा आहे.

राज्यात शनिवारी २५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १३, ठाणे ३०, पालघर ३२, अहमदनगर १६, पुणे २५, सोलापूर १२, सातारा २३, सांगली २०, रत्नागिरी १३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २५७ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. शनिवारी १०,३७३ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत ५७,१०,३५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -