घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : चौथ्या लाटेच्या चिंतेत महाराष्ट्राला दिलासा, २४ तासात ९७...

Maharashtra Corona Update : चौथ्या लाटेच्या चिंतेत महाराष्ट्राला दिलासा, २४ तासात ९७ कोरोनाबाधितांची नोंद, १ रुग्णाचा मृत्यू

Subscribe

जगभरात कोरोनाच्या चौथ्या लाटेने हाहाकार घातला आहे. चीनसह आशिया खंडातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. भारतातही कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टाचे व्हेरिएंट पुन्हा सक्रिया झाल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्येही महाराष्ट्रातील नागिरकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. तर गेल्या २४ तासात फक्त ९७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. नव्या व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचा शिरकाव अद्याप झाला नाही. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात १ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन वर्ष सुरु झाल्यापासून नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. यामुळे राज्यातील सक्रिया रुग्णांची संख्यासुद्धा कमी झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यात १ हजार ५२५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत ७७ लाख २३ हजार ००५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१० टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपर्यंत राज्यात ७ कोटी ८९ लाख ९ हजार ११५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७८ लाख ७२ हजार ३०० रुग्णांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४३ हजार ७६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

कोरोनाचा पुन्हा विस्फोट होत असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राच्या निर्देशानंतर राज्य सरकारसुद्धा अलर्ट झाले आहे. गर्दी होऊन पुन्हा कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. नवीन कोरोना विषाणू घातक असून एकाच दिवसात लाखाच्या संख्येने रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासात दक्षिण कोरियात ६.२१ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. जर्मनी, युनायटेड किंग्डममध्ये एकाच दिवसात लाखो रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : नारायण राणेंच्या अधीश बंगल्याविरोधात पालिकेची दुसरी नोटीस, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -