Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ; २३६ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ; २३६ जणांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात ५ हजार ८९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. गुरुवारीही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली. बुधवारी ९३५० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर गुरुवारी हा आकडा ९८३० इतका झाला. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९६० इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

२३६ जणांचा मृत्यू

गुरुवारी राज्यात २३६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई २०, ठाणे १५, पालघर १४, नाशिक १७, अहमदनगर १७, पुणे १३, सातारा ३३, कोल्हापूर २८, सांगली १७, रत्नागिरी १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २३६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.राज्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ०२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे.

५ हजार ८९० रुग्ण बरे 

- Advertisement -

तसेच आज राज्यात ५ हजार ८९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के एवढे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काहीसे घटलेले दिसले.

- Advertisement -
- Advertisement -
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -