घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख घसरला; 99 नवे रुग्ण, 180...

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख घसरला; 99 नवे रुग्ण, 180 रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 89 लाख 86 हजार 970 कोरोनी चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यातील 78 लाख 72 हजार 512(09.97 टक्के) चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेच्या चिंतेत राज्यासाठी ही सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे फक्त 99 नवे रुग्ण आढळून आले, तर 180 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष बाब म्हणजे राज्यात आजही कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यामुळे राज्यातील कोरोना मृत्यूदर हा 1.82 टक्के एवढा आहे. दिलासाजनक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे 1,273 अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर आजपर्यंत एकूण 77 लाख 23 हजार 468 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यातील एकूण 21 जिल्हे सध्या कोरोनामुक्त झाले आहेत. तर पाच जिल्ह्यांतील कोरोनाच्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोना महामारीची –

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६६६७ १०३६८१२ १६६९३ २८६३ २९९
ठाणे ७६६५३४ ७५४४७८ ११८६९ ३५ १५२
पालघर १६३४४९ १६००३५ ३३९२ १५
रायगड २४४२७३ २३९३०६ ४९३७ २३
रत्नागिरी ८४४०४ ८१८५७ २५४१
सिंधुदुर्ग ५७१४४ ५५६०६ १५१३ १५ १०
पुणे १४५२२९० १४३१४१९ २०१६३ ३५० ३५८
सातारा २७८१६३ २७१४२२ ६६७९ ३४ २८
सांगली २२७०२५ २२१३५९ ५६५५
१० कोल्हापूर २२०४५५ २१४५३४ ५८९९ १७
११ सोलापूर २२७०१६ २२११३० ५७५९ ११७ १०
१२ नाशिक ४७२७८१ ४६३८०५ ८९०४ ७१
१३ अहमदनगर ३७७४०० ३७००२२ ७२३० ११ १३७
१४ जळगाव १४९४८९ १४६७२२ २७२८ ३३
१५ नंदूरबार ४६६११ ४५६४९ ९५९
१६ धुळे ५०७०५ ५००३५ ६५९ ११
१७ औरंगाबाद १७६४१० १७२०८९ ४२७० १४ ३७
१८ जालना ६६३०९ ६५०८४ १२२३
१९ बीड १०९११० १०६२१२ २८७५ १६
२० लातूर १०४९१२ १०२४१५ २४८३
२१ परभणी ५८५३७ ५७२५२ १२५६ २०
२२ हिंगोली २२१६६ २१६५२ ५१३
२३ नांदेड १०२६५५ ९९९४३ २६९७
२४ उस्मानाबाद ७५१३८ ७२९९५ २०२३ ११६
२५ अमरावती १०५९२९ १०४३०१ १६२२
२६ अकोला ६६१६५ ६४६९३ १४६५
२७ वाशिम ४५६१४ ४४९७२ ६३८
२८ बुलढाणा ९१९२२ ९१०७७ ८२४ १५
२९ यवतमाळ ८१९७८ ८०१५८ १८१६
३० नागपूर ५७६३२७ ५६७०८६ ९१४३ ७१ २७
३१ वर्धा ६५६६३ ६४२५४ १२३७ १७१
३२ भंडारा ६७९३७ ६६७९४ ११३२ १०
३३ गोंदिया ४५४१५ ४४८२१ ५८०
३४ चंद्रपूर ९८८१२ ९७२१८ १५८८
३५ गडचिरोली ३६९६३ ३६२३० ६९१ ३४
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७८७२५१२ ७७२३४६८ १४३७६७ ४००४ १२७३

 

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 89 लाख 86 हजार 970 कोरोनी चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यातील 78 लाख 72 हजार 512(09.97 टक्के) चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने नागरिकांना निर्बंधांमधून दिलासा मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्हे कोरोनामुक्त होत असल्याने नागरिकांवरील बंधने हटवली जात आहे. यात संपूर्ण राज्य लवकरचं कोरोनामुक्त होईल अशी आशा केली जातेय.


Varun Dhawan करतोय ‘या’ साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -