Corona: चिमुकल्यांमध्ये वाढला कोरोनाचा धोका: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यात ९,९२८ मुलं कोरोनाग्रस्त

Maharashtra Corona Update 9,928 minors in Ahmednagar tested Covid positive in May
Corona: चिमुकल्यांमध्ये वाढला कोरोनाचा धोका: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मे महिन्यात ९,९२८ मुलं कोरोनाग्रस्त

राज्यात कोरोनाची परिस्थिती हळूहळू स्थिरावताना दिसत आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीट दर हा जास्त आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्यात आले असून काही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यादरम्यान राज्यातील चिमुकल्यांमध्ये कोरोना धोका वाढताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये १८ वर्षांखालील किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाचा शिरकाव अधिक होत आहे. फक्त एकाच महिन्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये ९ हजार ९२८ मुलं कोरोनाग्रस्त आढळल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर एप्रिल महिन्यात या वयोगटातील ७ हजार ७६० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

सिव्हिल सर्जन सुनील पोखरना म्हणाले की, एकूण पॉझिटिव्हीटी दर वाढल्यामुळे मुलांच्या पॉझिटीव्हीटीचे प्रमाण वाढले आहेत. एप्रिलमध्ये ७ हजार ७६० मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. परंतु आतापर्यंत कोणत्याही गंभीर घटनेची नोंद झाली नाही आहे.

 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धोरण आखण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय राज्य सरकारने अहमदनगर प्रशासनाला खासगी रुग्णालयात मुलांसाठी विशेष वॉर्ड करण्यास आणि तिथे आवश्यक औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सार्वाजनिक आरोग्य विभागाला आवश्यक तयारीसाठी टास्क फोर्स तयार करण्यात आदेश मागील आठवड्यात दिले होते. या टास्क फोर्समध्ये बालरोग तज्ज्ञांसह एकूण १३ तज्ज्ञ असतील.


हेही वाचा – Lockdown In Ratnagiri: २ जूनपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन; दूध आणि किराणा मालाची घरपोच सेवा होणार