घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात कोरोना उद्रेक, २८,६९९ कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना उद्रेक, २८,६९९ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात २४ तासात १३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने प्रशसानासमोरील चिंता देखील वाढली आहे. मुंबई,पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असताना दिसत आहे. मागील २४ तासात राज्यात २८,६९९ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने काही राज्यात अंशता लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच कठोर निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

राज्यात २४ तासात १३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात २,३०,६४१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर आजपर्यंत एकूण२२,४७,४९५करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात११,७७,२६५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारने नव्याने नियमावली जारी केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना लसीकरण वेगाने पूर्ण करण्याची तयारी राज्य सरकार करत आहेत. तसेच रुग्णांना शोधण्यासाठी ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटवर भर देण्यात आला आहे. कोरोना नियमांचे पालन आणि अंमलबजावणी करण्याचेही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३५१४ ३६९४५१ ११६०४
ठाणे ४०७ ४७२२९ १००९
ठाणे मनपा ८१४ ७१०८७ १२५४
नवी मुंबई मनपा ४९६ ६५४७६ ११७२
कल्याण डोंबवली मनपा ७२० ७६३३३ १०९१
उल्हासनगर मनपा १२७ १२९२८ ३६५
भिवंडी निजामपूर मनपा ४० ७३७८ ३४२
मीरा भाईंदर मनपा १८६ ३०७६० ६७३
पालघर ११४ १८०६४ ३२१
१० वसईविरार मनपा १०९ ३३२०५ ६३७
११ रायगड १२२ ४००५६ १००७
१२ पनवेल मनपा २२१ ३६०९८ ६२६
ठाणे मंडळ एकूण ६८७० ८०८०६५ २६ २०१०१
१३ नाशिक ५२१ ४६६३९ ८५२
१४ नाशिक मनपा ९४७ १००३८५ १११९
१५ मालेगाव मनपा ३४ ६४७९ १७२
१६ अहमदनगर ४५६ ५५४६० ७६३
१७ अहमदनगर मनपा २२२ ३००३२ ४२५
१८ धुळे २३८ ११०४० १९१
१९ धुळे मनपा १७९ १०९४२ १५०
२० जळगाव ९४१ ५६९८२ १२११
२१ जळगाव मनपा १६३ २०७४४ ३५३
२२ नंदूरबार ६१८ १४९२० २४४
नाशिक मंडळ एकूण ४३१९ ३५३६२३ २१ ५४८०
२३ पुणे ११०८ ११२०५० २१८८
२४ पुणे मनपा ३१४५ २४८१४३ ११ ४६७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४८८ १२१०१९ १३५८
२६ सोलापूर २२९ ४६७७९ १२४३
२७ सोलापूर मनपा २३९ १५६४८ ६३८
२८ सातारा १५७ ६२५७३ १८७५
पुणे मंडळ एकूण ६३६६ ६०६२१२ २४ ११९७४
२९ कोल्हापूर ४० ३५३२४ १२६०
३० कोल्हापूर मनपा २६ १५३५० ४२५
३१ सांगली १६७ ३४१६९ ११६९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३७ १८७२६ ६३७
३३ सिंधुदुर्ग २४ ६९३५ १८३
३४ रत्नागिरी १३३ १२६८७ ४२८
कोल्हापूर मंडळ एकूण ४२७ १२३१९१ ४१०२
३५ औरंगाबाद ६५२ २०३०२ ३५४
३६ औरंगाबाद मनपा ११२५ ५१९९७ ९६६
३७ जालना ४०४ २००९० ४०१
३८ हिंगोली १०८ ६११५ १००
३९ परभणी १७६ ६०१९ १७७
४० परभणी मनपा १६५ ५३२३ १४४
औरंगाबाद मंडळ एकूण २६३० १०९८४६ २१४२
४१ लातूर २१० २३६५९ ४८७
४२ लातूर मनपा २२६ ५६३५ २३९
४३ उस्मानाबाद १८३ १९५२५ ५८१
४४ बीड २१३ २३१९८ ५९२
४५ नांदेड ४९५ १२९१० ४०२
४६ नांदेड मनपा ११७१ २११४० ३१८
लातूर मंडळ एकूण २४९८ १०६०६७ १६ २६१९
४७ अकोला १८८ ९३१२ १५२
४८ अकोला मनपा ३७२ १५९४४ २६६
४९ अमरावती ९३ १५७४२ २६५
५० अमरावती मनपा १२० ३०८१५ ३४८
५१ यवतमाळ ४६४ २५४७३ ५२३
५२ बुलढाणा ३२७ २४८४६ २७३
५३ वाशिम २८० १३५५६ १७४
अकोला मंडळ एकूण १८४४ १३५६८८ १६ २००१
५४ नागपूर ८१२ ३०४८५ ८४४
५५ नागपूर मनपा २२७९ १७२८१४ ११ २८४५
५६ वर्धा २३४ १९०१४ ३५६
५७ भंडारा १९९ १५६६५ ३१५
५८ गोंदिया ४८ १५३३६ १७७
५९ चंद्रपूर ७० १६९०७ २६०
६० चंद्रपूर मनपा ४० १०२७० १७३
६१ गडचिरोली ६३ ९६९७ १०६
नागपूर एकूण ३७४५ २९०१८८ २१ ५०७६
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण २८६९९ २५३३०२६ १३२ ५३५८९
Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -