Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राज्यातील मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत; ११ हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही

राज्यातील मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत; ११ हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. बुधवारी १० हजार ९८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १६ हजार ३७९ जण बरे होऊन गेले. एकूण महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ५८ लाख ६३ हजार ८८०वर पोहोचली आहे. यापैकी आतार्यंत १ लाख १ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला असून ५५ लाख ९७ हजार ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण राज्यातील कोरोना मृत्यूची संख्या त्यापेक्षा जास्त असल्याचे समोर येत आहे. म्हणजेच जिल्हा स्तरावरून आलेली मृत्यूची संख्या आणि राज्य सरकारच्या पोर्टलवर असलेल्या मृत्यूच्या संख्येत तफावत आहे. ११ हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही आहे. त्यामुळे आता राज्यातील मृत्यूच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. यासंदर्भात आता आरोग्य विभागाने दोन दिवसांत ११ हजारांहून अधिक मृत्यूची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

दरम्यान जिल्हा स्तरावरून राज्य सरकारच्या पोर्टलसाठी माहिती दिली जाते. जेव्हा याची टॅली करण्यात आली, तेव्हा जिल्हा स्तरावरून आलेली माहिती आणि राज्य सरकारच्या पोर्टलवर असलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे समोर आले. राज्यातल्या जिथे प्रमुख मोठ्या महानगरपालिका आहेत, तिथला मृत्यूची संख्या आणि राज्य सरकारने दिलेली माहिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. एकूण ११ हजारांहून अधिक मृत्यूची तफावत आहे. यामुळे आरोग्य विभागाने आता दोन दिवसांत ११ हजारांहून अधिक असलेल्या रुग्णांची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नोंद न झाल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूच्या संख्येत ही नोंद झाली तर मृत्यूची एकूण संख्येत किमान १० टक्क्यांची वाढ होईल. पण या प्रकारामुळे आता काही जण मृत्यूची संख्या लपवल्याचा आरोप करत आहे. तसेच ही जी प्रशासकीय गफलत झाली आहे, ती जाणीवपूर्वक झाली की केली गेली आहे? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

कोणत्या विभागात मृत्यूच्या संख्येत किती तफावत?

- Advertisement -

विभाग            मृत्यूच्या संख्येतील तफावत
मुंबई                     १,६०४
नाशिक                    ४२७
पुणे                      ५,७६८
कोल्हापूर                  ४१
औरंगाबाद                १,०८६
लातूर                       ८१
अकोला                    ८३५
नागपूर                    १,८९३

- Advertisement -