Corona Update : राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक; 149 नवे रुग्ण, 222 कोरोनामुक्त

maharashtra corona update patients 222 discharged today 149 new cases in the state today
Corona Update : राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक; 149 नवे रुग्ण, 222 कोरोनामुक्त

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या घट होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 222 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 1084 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 77,23, 959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे राज्यातील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 98.11 टक्के झाले आहे. याशिवाय आत्तापर्यंत 143769 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या 7, 90, 68, 319 चाचण्या करण्यात आला आहे.

मुंबईत 46 नवे कोरोना रुग्ण, 44 कोरोनामुक्त 

दरम्यान राज्याप्रमाणे मुंबईत देखील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून 50 च्या आत रुग्ण आढळून येत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 46 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1037806 झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९८ टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या राज्याच्या तुलनेत कोरोनाचे सर्वाधित सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आता 277 सक्रिय रुग्ण आहे. त्या खालोखाल सक्रिय रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 136 सक्रिय रुग्ण आहे. परंतु मागील 15 दिवसांपासून मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 22154 दिवसांवर पोहचला आहे. तर 16 मार्च ते 22 मार्चपर्यंत कोविड वाढीचा दर 0.03 टक्क्यांवर पोहचला आहे.


केंद्रीय यंत्रणांसंदर्भातील आशिष शेलारांनी केलेली ‘ती’ मागणी गृहमंत्र्यांनी केली मान्य