Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 139 नवे रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू

India Coronavirus Update today 1270 new covid cases 31 death in last 24 hour
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू

राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. त्यामुळे देशासह राज्यातील कोरोना निर्बंध शिथील केले जात आहेत. दिलासाजनक बाब म्हणजे राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण सर्वाधिक आहेत. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 139 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना मृतांचे प्रमाण 1.82 टक्के झाला आहे. यासोबत 255 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात घटले आहे. राज्यात आज 965 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 78,72,956 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 77,24, 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान कोरोनामुळे राज्यात आत्तापर्यंत 143772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. तर राज्यात आजपर्यंत 7,91,13,785 कोरोना चाचण्या केल्या आहेत.

 

मुंबईत आज 54 नवे रुग्ण

दरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ-उतार होत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 54 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 73 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1057715 झाली आहे. मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98 टक्के झाले आहे.
मुंबईत सध्या 258 सक्रिय रुग्ण आहेत. आज नोंद झालेल्या 54 रुग्णांपैकी 4 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. परंतु मागील 15 दिवसांपासून मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 21865 दिवसांवर पोहचला आहे. तर 16 मार्च ते 22 मार्चपर्यंत कोविड वाढीचा दर 0.03 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत आज कोरोनाच्या 15,456 चाचण्या करण्यात आल्या, तर आत्तापर्यंत 165,39,131 चाचण्या करण्यात आल्या आहेत.