Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ; 275 नवे रुग्ण, 346 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून चौथ्या लाटेच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या डेल्टाक्रॉन व्हेरिएंटने जगभरात पुन्हा डोके वर काढले आहे. यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. दरम्यान महाराष्ट्रातही आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 275 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 346 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. काल हीच संख्या 139 वर होती. तर तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र सक्रिय रुग्णांच्या संख्येत आज घट झाली आहे. राज्यात आज 892 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 78,73,231 रुग्ण आढळून आले आहेत. तर 14,77,79 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण 77,24,560 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,91,56,002 कोरोना चाचण्यांपैकी 78,73,231 चाचण्या पॉझिटिव्ह आले आल्या आहे. हे प्रमाण 09.95 टक्के इतके आहे.

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६८३१ १०३७०२५ १९५५८ २४८
ठाणे ७६६५८२ ७५४५२० ११९०५ १५७
पालघर १६३५८५ १६०१७१ ३४०७
रायगड २४४२८२ २३९३१९ ४९४५ १८
रत्नागिरी ८४४०५ ८१८५८ २५४६
सिंधुदुर्ग ५७१४४ ५५६१० १५२८
पुणे १४५२४२० १४३१६८५ २०५१६ २१९
सातारा २७८१७४ २७१४४२ ६७१३ १९
सांगली २२७०३२ २२१३६५ ५६६४
१० कोल्हापूर २२०४५७ २१४५४६ ५९०४
११ सोलापूर २२७०१८ २२११३७ ५८७६
१२ नाशिक ४७२७९२ ४६३८८६ ८९०५
१३ अहमदनगर ३७७४५२ ३७०१२४ ७२४२ ८६
१४ जळगाव १४९४९८ १४६७३४ २७६१
१५ नंदूरबार ४६६१२ ४५६४९ ९६२
१६ धुळे ५०७०९ ५००३७ ६७०
१७ औरंगाबाद १७६४७२ १७२१६३ ४२८४ २५
१८ जालना ६६३११ ६५०८५ १२२४
१९ बीड १०९१२० १०६२२४ २८८२ १४
२० लातूर १०४९१४ १०२४१८ २४८९
२१ परभणी ५८५३७ ५७२६० १२७६
२२ हिंगोली २२१६७ २१६५३ ५१४
२३ नांदेड १०२६५७ ९९९४७ २७०४
२४ उस्मानाबाद ७५१४२ ७२९९९ २१३९
२५ अमरावती १०५९३२ १०४३०४ १६२३
२६ अकोला ६६१६८ ६४६९४ १४७०
२७ वाशिम ४५६१४ ४४९७३ ६४१
२८ बुलढाणा ९१९४६ ९११०६ ८३० १०
२९ यवतमाळ ८१९७९ ८०१५९ १८२०
३० नागपूर ५७६३३७ ५६७१०४ ९२१४ १९
३१ वर्धा ६५६६४ ६४२५४ १४०८
३२ भंडारा ६७९३९ ६६७९५ ११४२
३३ गोंदिया ४५४१६ ४४८२७ ५८७
३४ चंद्रपूर ९८८१५ ९७२२० १५९२
३५ गडचिरोली ३६९६४ ३६२३६ ७२५
इतरराज्ये/ देश १४४ ३१ ११३
एकूण ७८७३२३१ ७७२४५६० १४७७७९ ८९२

मुंबईत आज 37 नवे रुग्ण, 1 मृत्यू

राज्यापाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 38 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय आज 47 रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. यामुळे मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1,037,926 इतकी झाली आहे. मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98 टक्के झाले आहे.

मुंबईत सध्या 248 सक्रिय रुग्ण आहेत. आज नोंद झालेल्या 38 रुग्णांपैकी 1 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 1 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 19792 दिवसांवर पोहचला आहे. तर 18 मार्च ते 24 मार्चपर्यंत कोविड वाढीचा दर 0.04 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत आज कोरोनाच्या 11,839 चाचण्या करण्यात आल्या, तर आत्तापर्यंत 165,50,970 चाचण्या करण्यात आल्या आहेत.


CET EXAM: प्रवेशपूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर