घरमहाराष्ट्रMaharashtra Corona Update: राज्यातील बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण दुप्पट, मृतांची...

Maharashtra Corona Update: राज्यातील बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण दुप्पट, मृतांची संख्याही घटली

Subscribe

राज्याच आज एकूण ८८,७२९ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर कोरोना मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. दिलासाजनक बाब म्हणजे, राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट आहे. रविवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्या २ हजारांची घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ८७७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११,०७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे.

- Advertisement -

.क्र.

जिल्हा

- Advertisement -

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७३४४१५

७०९०१३

१५८४५

२३७१

७१८६

ठाणे

५९१०७५

५६८७३७

१०९८३

३४

११३२१

पालघर

१२९२९९

१२५०९६

३११७

१४

१०७२

रायगड

१८०७६४

१७४५२८

४१६०

२०७०

रत्नागिरी

७०१६७

६५६७१

१९९१

२५०१

सिंधुदुर्ग

४७३१६

४४०१०

१२००

१५

२०९१

पुणे

१०८३८६२

१०४९६५९

१८३८४

२६९

१५५५०

सातारा

२१४०९४

२०१७१५

५१३६

२४

७२१९

सांगली

१८००६९

१६५२७६

४९३८

९८४७

१०

कोल्हापूर

१९१६३८

१७५९०९

५४०२

१०३२२

११

सोलापूर

१८४९१८

१७५७७४

४८०७

९१

४२४६

१२

नाशिक

४०१९३१

३९२५२१

८४९७

९१२

१३

अहमदनगर

२८१४६९

२७०५२७

६०९९

४८४२

१४

जळगाव

१३९६३२

१३६४०२

२६३६

३२

५६२

१५

नंदूरबार

४००७२

३८९९९

९५३

११७

१६

धुळे

४६१९०

४५१३७

६४७

१२

३९४

१७

औरंगाबाद

१५३६८४

१४९३७६

३९०४

१४

३९०

१८

जालना

६००१२

५८७७४

११९४

४३

१९

बीड

९७४९२

९२१५१

२६०२

२७३२

२०

लातूर

९०५३८

८७८०५

२३९६

३३१

२१

परभणी

५२०५४

५०६८९

१२०३

१७

१४५

२२

हिंगोली

१८३४७

१७८०२

४८७

५७

२३

नांदेड

९०५५७

८७४५६

२६५६

४३९

२४

उस्मानाबाद

६३४५४

६०७३६

१७९७

१०९

८१२

२५

अमरावती

९४६२५

९२८६५

१६३१

१२७

२६

अकोला

५९०५०

५७४८२

१४१४

१५०

२७

वाशिम

४१६१८

४०८६३

६३५

११७

२८

बुलढाणा

८४४८४

८३४८५

७४६

२४७

२९

यवतमाळ

७६०६८

७४२८९

१७६६

३०

नागपूर

४९२९४७

४८२०२८

९१३१

७१

१७१७

३१

वर्धा

५८५९९

५६७७०

१२०६

१६५

४५८

३२

भंडारा

६००८२

५८६४३

११०८

१०

३२१

३३

गोंदिया

४०४७८

३९८४९

५६२

६०

३४

चंद्रपूर

८८४३९

८६६४०

१५६०

२३५

३५

गडचिरोली

३०२१४

२९४२९

६९४

३०

६१

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

६२६९७९९

६०४६१०६

१३१६०५

३३५९

८८७२९

राज्य़ात ५ लाख १ हजार ७५७ व्यक्ती होमक्वारंटाईन

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,६९,७९९ झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ४६ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्य़ात ५ लाख १ हजार ७५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. परंतु वाढत्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात ब्रेक लागल्याने चिंता मिटली आहे.

राज्याच आज एकूण ८८,७२९ सक्रिय रुग्ण 

राज्याच आज एकूण ८८,७२९ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद ,नागपूर सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत १ लाख ३१ हजार ६०५ रुग्णांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६९ लाख ९५ हजार १२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ६९ हजार ७९९(१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. आरोग्य तज्ज्ञांकडूनही तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असला तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसरी लाट धोकादायक नसल्याचे मत व्य़क्त करत आहेत. मात्र राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या उपाययोजना करुन ठेवल्या आहेत. तसेच काही ठिकाणी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.


ऍस्ट्राझेनेका आणि फायझर लसींचा एक एक डोस घेतल्यास अँटिबॉडीजमध्ये सहापट वाढ, संशोधनातून खुलासा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -