Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra corona update: राज्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूसंख्येत मोठी घट, गेल्या २४ तासात...

Maharashtra corona update: राज्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूसंख्येत मोठी घट, गेल्या २४ तासात १० हजार २१९ कोरोनाबाधितांची नोंद

सध्या राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत मोठी घट झाली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतू आजपासून (सोमवार ७ जून) राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. महारष्ट्रातील काही जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १० हजार २१९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात १५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. गेल्या २४ तासात २१ हजार ०८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनारुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही आहे.

राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी लॉकडाऊन पुर्णपणे उठवण्यात आला नाही असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यात ५५ लाख ६४ हजार ३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गेल्या २४ तासात २१ हजार ०८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२५% एवढे झाले आहे. राज्यात आज १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत ३ कोटी ६६ लाख ९६ हजार १३९ कोरोना चाचण्या तपासण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी ५८ लाख ४२ हजार कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,७४,३२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात १०,२१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,४२,००० झाली आहे.

राज्यात आज नोंद झालेल्या एकूण १५४ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८६ ने वाढली आहे. हे १८६ मृत्यू, यवतमाळ-४९, पुणे-३५, कोल्हापूर-२५, नाशिक-१५, ठाणे-१४, अहमदनगर-११, अकोला-८, औरंगाबाद-७, उस्मानाबाद-५, सिंधुदुर्ग-५, चंद्रपूर-३, लातूर-२, रायगड-२, जालना-१, नागपूर-१, सांगली-१, सोलापूर-१ आणि पालघर-१ असे आहेत.

- Advertisement -