Maharashtra Corona Update: गेल्या दोन आठवड्यात कोणत्या जिल्ह्यात रुग्ण वाढले, कुठे घट? केंद्राने दिली माहिती

Maharashtra Corona Update which district has the number of patients increased or decreased in the last two weeks?
Maharashtra Corona Update: गेल्या दोन आठवड्यात कोणत्या जिल्ह्यात रुग्ण वाढले, कुठे घट? केंद्राने दिली माहिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात कहर केला आहे. राज्यात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र काही जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज केंद्राने गेल्या दोन आठवड्यात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात रुग्ण वाढले आणि कुठे घटले याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. यामध्ये नाशिक, ठाणे, मुंबई, लातूर, औरंगबाद, जळगाव, भंडारा, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसह अन्य राज्यांतील काही जिल्ह्यांत गेल्या २ आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील १२ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय आहेत. तर ७ राज्यांमध्ये १ लाख ते ५० हजार रुग्ण सक्रिय रुग्ण असून १७ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार राज्यात जास्तीत जास्त सक्रिय रुग्ण आहेत. तसेच २४ राज्यांमध्ये पॉसिटीव्हीटी दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जे चिंतेचे कारण आहे. गोव्यात पॉसिटीव्हीटी दर सर्वाधिक म्हणजे ४८.५ टक्के, तर त्याखालोखाल हरियाणामध्ये ३६.१ टक्के , पुदुच्चेरीत ३४.९ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ३३.१ टक्के आहे.


हेही वाचा – Covid-19 Third Wave:..तरच रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट