Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्राला कमी लस पुरवठा, कोण काय म्हणाले?

महाराष्ट्राला कमी लस पुरवठा, कोण काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र कोरोना लसीकरणावरून राजकारण सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्री केंद्राकडे सतत कोरोना लसीचा साठा वाढवून द्यावा अशी मागणी करत आहेत. तर केंद्र महाराष्ट्राला इतर राज्यापेक्षा सर्वाधिक लस पुरवल्याचा दावा करत आहे. यात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी केंद्र लसीकरणावरून महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचा दावा केला. त्यामुळे लस पुरवठ्याचा मुद्द्यावरून राज्य सरकारविरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगू लागला आहे.

यावर सरकारमधील मंत्री जयंत पाटील, रोहित पवार, नाना पटोले यांनी केंद्राने अधिक लसीचा पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षातील भाजपा नेते यावर उत्तर देत सरकारमधील मंत्री देंवेद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने लसीकरणावरून राजकारण थांबा अशी मागणी केली आहे. त्यामुळे ट्विटवर सध्य़ा केंद्र विरुद्ध राज्य सरकार आणि भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद पाहायला मिळतो.

- Advertisement -

यातच काल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन जाधव यांनी लसीकरणावरून केलेल्या आरोपांमुळे राजकारण अधिक तापले आहे. यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज ट्विट करत हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करत केंद्राकडून लसीची मागणी केली आहे.

- Advertisement -

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही लस पुरवठ्यावरून केंद्रावर तोफ डागत अधिक लसीची मागणी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह मोदी सरकारवर लसीकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकार लसीकरण केंद्र बंद करत केंद्राविरुद्ध चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावा केला.

 

दरम्यान विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लसीकरणावरून महाराष्ट्र सरकारावर टीका केली आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत राज्यात लसीकरणावरून राजकारण सुरु आहे असा आरोप केला.

- Advertisement -