घरताज्या घडामोडीकोरोनाच्या भीतीने चोरांनी पीपीई किट घालून ७८ तोळे दागिन्यांची केली चोरी

कोरोनाच्या भीतीने चोरांनी पीपीई किट घालून ७८ तोळे दागिन्यांची केली चोरी

Subscribe

ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस यांचा अधिक तपास करत आहेत.

एका बाजूला देशात कोरोना विषाणू विरुद्ध युद्ध सुरू आहे. या युद्धात लढण्यासाठी पीपीई किटचा वापर केला जात आहे. पण दुसऱ्या बाजूला याच पीपीई किटचा वापर चोरी करण्यासाठी केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. असा एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. कोरोनाच्या भीतीने पीपीई किट घालून चोरांनी सोन्याच्या दुकानातून दागिन्यांची चोरी केली आहे. या चोरट्यांनी तब्बल ७८ तोळे दागिन्यांची चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेबाबत कळताच तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच क्षणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. सध्या या घटनेचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कॅप्स, मास्क, प्लास्टिक जॅकेट आणि हातमोजे घातले होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. चोरांनी पहिल्यांदा शोकेसमधील सोन्याचे दागिने चोरले आणि त्यानंतर दुकानात घुसून प्रत्येक ठिकाणी असलेल्या सोन्याचे दागिने चोरले.

पोलिसांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी चोरांनी पीपीई किट घालून चोरी केली. तब्बल ७८ तोळे दागिन्यांची चोरी केली आहे. चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत ३५ लाख असल्याचा अंदाज आहे. ही सर्व घटना  सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! कुंकू लावलेल्या लिंबाचा प्रसाद खाऊन २० जणांना कोरोना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -