घरताज्या घडामोडीLive Update: आज राज्यात ३,३९१ नव्या कोरोना रुग्णांचे निदान; ८० रूग्णांचा मृत्यू

Live Update: आज राज्यात ३,३९१ नव्या कोरोना रुग्णांचे निदान; ८० रूग्णांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात ३,३९१ नव्या कोरोना रुग्णांचे निदान

आज राज्यात ३,३९१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान. तर राज्यात आज ८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आज ३,८४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२८,५६१ कोरोना बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

राधाकृष्ण बी यांनी जनतेकडून कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच नागरिकांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीदेखील नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली.


लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा येथील 40 वर्षीय शेतकरी लालगीर माधवगीर गिरी यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. विष पिल्यानंतर शेजारी आणि घरच्या मंडळीनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्याचा मुत्यू झाला आहे

- Advertisement -

दिल्लीत गेल्या २४ तासांत ४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ४४ जण बरे होऊ घरी गेली आहेत.


पंजाब मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. सविस्तर वाचा 


साडे चार वाजता पंजाब राज भवन गेट येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.

हे वाचा – अमरिंदर सिंह यांचे हायकमांडला चॅलेंज


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. हसन मुश्रीफ यांना नेमकं काय झालं आहे? याबाबत नेमकी माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे. सध्या त्यांच्यावर डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.


शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगाल्यावर गेले आहेत. भावी सहकारी या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राऊत-ठाकरेंमध्ये वर्षा बंगल्यावर खलबतं होत असल्याचं समोर येत आहे.


मुंबईतील कांजुरमार्गमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षारक्षकाने ११ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचे समोर येत आहे. पीडित मुलीनं पालकांना माहिती दिल्यानंतर घटना उघड झाली असून कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना वॉरंट बजावण्यासाठी सीआयडी टीम चंदीगडमध्ये पोहोचली आहे.. मात्र अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या टीमला परमबीर सिंह भेटले नाहीत. चांदीवाला आयोगाने काढलेले समन्स बजावण्यासाठी सीआयडीची टीम काही दिवस चंदीगडमध्ये थांबणार आहे.


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीनला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी याबाबतची माहिती दिली. केतन तन्ना, सोनू जलान यांनी परमबीर यांच्यासह २८ जणांविरोधात खंडणीची तक्रार दिली होती. या तक्रारीत तारिकचं नाव असल्याने त्याच्यावर ठाणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.


महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्रितपणे दहशतवादी मॉड्यूलसंबंधित मुंबईतील जोगेश्वरी येथे कारवाई केली. या कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सविस्तर वाचा 


देशात आतापर्यंत ५५ कोटी ७ लाख ८० हजार २७३ नमुन्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल, शुक्रवारी दिवसभरात १४ लाख ४८ हजार ८३३ जणांच्या नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


ओडिसामधील पुरी जिल्ह्यातील श्री जगन्नाथ मंदिर आज, शनिवारपासून भाविकांसाठी पुन्हा खुले झाले. पूर्वी मंदिर दर आठवड्याला ५ दिवस खुले असायचे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -