घरमहाराष्ट्रMaharashtra Council : भाषेच्या शुद्ध अशुद्धतेवरुन कुणाची थट्टा करु नये; का म्हणाल्या...

Maharashtra Council : भाषेच्या शुद्ध अशुद्धतेवरुन कुणाची थट्टा करु नये; का म्हणाल्या गोऱ्हे असं?

Subscribe

विधान परिषदेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं. यावर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पॉलीटेक्नीक आणि इंजिनिअरींग दोन्ही अभ्यासक्रमाची पुस्तके इंग्रजित केली.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या आज चौथ्या दिवशी विधान परिषदेमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये सादर केले. यामध्ये एआय हे तंत्रज्ञान मातृभाषेतून शिकता येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान मराठी भाषेतील शुद्ध- अशुद्धवरुन सभागृहात रंगलेल्या चर्चेदरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हेंनी भाषेतील शुद्ध अशुद्धतेवरुन कुणाची थट्टा करु नये असे ठणकावून सांगितले. (Maharashtra Council No one should be ridiculed on pure impurity of language Why did the bulls say that)

विधान परिषदेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं. यावर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पॉलीटेक्नीक आणि इंजिनिअरींग दोन्ही अभ्यासक्रमाची पुस्तके इंग्रजित केली. AI शिककणावरे प्राध्यापक इंग्रजित शिकवतील पण ते आपल्या मातृभाषेत ऐकू येईल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान यावर प्रश्न उपस्थित करताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मातृभाषेतून AI चं शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरी मिळविण्यासाठी भाषेची अडचण येणार नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा : Uday Samant : आमच्या जागा आम्हाला द्या; शिवसेनेची भूमिका

त्या शंकेवर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, चार वर्षाच्या अभ्यासक्रमात एकाचवेळी दोन विद्यापीठाची पदवी घेता येते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरी करायची असेल तर त्याला इंग्रजी शिकावीच लागणार असल्याचे ते म्हणाले. यानंतर विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित करत काही शब्द हे इंग्रजीतच आहेत, ते कोणी बदलायचे कसे? असा प्रश्न विचारला.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुरू तरी काय? वडेट्टीवारांकडून धक्कादायक घटनेचा खुलासा

सभागृहातील चर्चेवर बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठीतील शब्दांचा अर्थ अवघड झाला तर आपण त्याची हेटाळणी करतो. परंतु यामुळे आपण आपलीच हेटाळणी करुन घेतो. तेव्हा सोपी सोपी शब्द, की जे लोकांना माहिती आहेत बोलीभाषेमधील त्याचं मुद्दामहून हट्टाणं मराठी करणं आवश्यक नाही. काही आदिवासी महिलांना विचारलं कशी आहे तर त्या म्हणतात बेस आहे. तिला म्हणणार का बेस म्हणू नको छान म्हण. याची काही गरज नाही. काही शब्द रुढ झाले आहेत त्याचा अर्थ समजून घ्यावा. शिक्षणाची भाषा मातृभाषेत शिक्षण असलं पाहिजे म्हणजे मुलांना शिक्षण सोपं जातं. परंतु कुणी कुणाची शुद्ध अशुद्धवरुन थट्टा करु नये, बॅंकेत, रेल्वेत हिंदी भाषा जरी असली तरी तेथे मराठीसुद्धा वापरली जाते. अशाही उपसभापती नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -