घरमहाराष्ट्रMaharashtra Crime : ...तरी गुंडगिरी कशी थांबणार? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Maharashtra Crime : …तरी गुंडगिरी कशी थांबणार? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Subscribe

मुंबई : राज्यात एकापाठोपाठ एक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे पोलिसांनी पुण्यात कुख्यात गुंडाची परेड काढली होती. यावरून ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या महाराष्ट्राला का बदनाम करत आहे हे भाजपप्रणित खोके सरकार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : “महाराष्ट्राचे गृहमंत्री मनोरुग्ण…”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर घणाघाती टीका

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील एका जमिनीच्या वादातून 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याणमधील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यापाठोपाठ, चाळीसगावमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना 7 फेब्रुवारी संध्याकाळी घडली होती. तर, दहिसर येथे गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोरोन्हाने गोळ्या घालून हत्या केली. मॉरिसने नंतर स्वत:वरही चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

- Advertisement -

यादरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अलीकडेच सूत्रे हाती घेणाऱ्या अमितेश कुमार यांनी तेथील लहान- मोठ्या अशा सुमारे 250 गुंडांची परेड काढली होती. यामध्ये काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी भेट घेतलेला कुख्यात गुंड गजा मारणे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एका फोटोत दिसणारा कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचाही समावेश होता.

हेही वाचा – Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसची सुपारी देऊन हत्या झाली का? उद्धव ठाकरेंना शंका

हाच संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जेव्हा सत्ताधारी पक्षच गुंडगिरी करू पाहतो, दहशतवाद वाढवू पाहतो, अशावेळी पोलिसांनी गुन्हेगारांच्या शंभर परेड काढल्या तरी गुंडगिरी कशी थांबणार? नागरिक सुरक्षित कसे राहणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -