घरमहाराष्ट्रMaharashtra Crime : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, दोन्ही काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Maharashtra Crime : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, दोन्ही काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून करण्यात आलेली हत्या, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार, पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि विधिज्ञ असीम सरोदे यांच्या गाडीवर झालेला हल्ला या मुद्द्यांवर राज्य सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी केली. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण तापू लागले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘राज्यपालांकडून आम्हाला अपेक्षा नाही; सरकार हटवा राष्ट्रपती राजवट लागू करा’

- Advertisement -

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे. जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचारांना कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. मागील दोन महिन्यातील घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या आहेत. या घटनांची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन केली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे, .नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

…तर दाद कुणाकडे मागायची?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून ताबडतोब निवडणूका घेण्याची आग्रही मागणी केली. मात्र त्याचबरोबर, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे जाणार नसल्याचे सांगत, याआधीचे राज्यपाल जरा जास्तच कर्तव्यदक्ष होते, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडाबरोबर एकत्र फोटो आहे. राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? असा सवालही ठाकरे यांनी केला. राज्यपालांकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नसून राज्यपाल हे पद ठेवायचे किंवा नाही हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे, असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : “Get Well Soon उद्धवजी” फडणवीसांचा ठाकरेंना टोला

राज्यपालांच्या भेटीला अर्थ नसतो – अजित पवार

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचं काय कारण आहे? असे सांगून अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत होतो, तेव्हा आम्ही सु्द्धा अनेकवेळा राज्यपालांची भेट घेतली. पण त्या भेटीला काही अर्थ नसतो. हे भेट देणाऱ्या सर्वांना माहिती असते. फक्त त्यानिमित्ताने माध्यमांमध्ये दाखवले जाते की, आम्ही राज्यपालांची भेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -