घरक्राइमजळगावच्या मन्या सुर्वेची हवा गुल, पोलिसांनी अशी घडवली अद्दल; नेमकं प्रकरण काय?

जळगावच्या मन्या सुर्वेची हवा गुल, पोलिसांनी अशी घडवली अद्दल; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

भाईगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्यामुळे हात जोडून माफी मागायची वेळ त्या स्वयंघोषित डॉनवर आली.

भाईगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्यामुळे हात जोडून माफी मागायची वेळ त्या स्वयंघोषित डॉनवर आली. विठ्ठल पाटील असं भाईगिरी करणाऱ्या तरुणांच नाव असून, तो जळगाव शहरात असलेल्या अयोध्या नगरातील रहिवासी आहे. हा सारा प्रकार जळगावातील आकाशवाणी चौकात 16 मे रोजी साडेदहा वाजता घडला आहे. हा तरुण चारचाकीच्या बोनेटवर बसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी अद्दल घडवल्यानंतर 17 मे रोजी त्याने माफी मागितल्याचा व्हिडीओ पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ( Maharashtra Crime Jalgaon self proclaimed don of Jalgaon well dealt wiht by the police )

नेमकं प्रकरण काय?

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून फिरताना काही तरुणांनी चार चाकीच्या बोनेटवर बसलेल्या एकाचा व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओवर जळगावचा मन्या सुर्वे असा मजकूर लिहून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

तसंच त्याला चांगली अद्दल अडवून यापुढे असं कुठलंही कृत्य करणार नाही, असा तरुणाचा बोलतानाचा व्हिडिओ तयार केला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला. अशाप्रकारे दहशत निर्माण करण्याच्या उद्धेशआने वाहनावर बसून व्हिडीओ तयार करणं हे बेकायदेशीर बाब असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यासोबतच अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा; उद्याची CBI चौकशी टळली )

विठ्ठलचा माफीनामा प्रसिद्ध

जळगावचा मन्या सुर्वे उर्फ विठ्ठल याचा माफी मागतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. गुन्हा दाखल होत असतानाचा बुधवारी विठ्ठल पाटील याने जळगावकरांची माफी मागणारा दुसरा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या कृत्याचे समर्थन करत नसून, कायदा हाच सर्वोच्च आहे. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशा संदेश देणार व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -