घरमहाराष्ट्रMaharashtra Crime : ...याची ‘श्वेतपत्रिका’ काढा, जितेंद्र आव्हाडांचे सरकारला आवाहन

Maharashtra Crime : …याची ‘श्वेतपत्रिका’ काढा, जितेंद्र आव्हाडांचे सरकारला आवाहन

Subscribe

मुंबई : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. गेल्या 10 दिवसांत ठिकठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतांश घटनांमध्ये राजकारण्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. रिव्हॉल्व्हर लायसन्सच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘राज्यपालांकडून आम्हाला अपेक्षा नाही; सरकार हटवा राष्ट्रपती राजवट लागू करा’

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील एका जमिनीच्या वादातून 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याणमधील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यापाठोपाठ, चाळीसगावमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना 7 फेब्रुवारी संध्याकाळी घडली होती. तर, दहिसर येथे गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोरोन्हाने गोळ्या घालून हत्या केली. मॉरिसने नंतर स्वत:वरही चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर आज, शनिवारी पुन्हा एकदा पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून अनिल ढमाले याने आकाश जाधव यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ढमाले स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा – Maharashtra Crime : गोळीबाराचे सत्र सुरूच; मुंबईनंतर आता पुण्यात फायरिंग

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर शरसंधान केले आहे. किती रिव्हॉल्व्हर कोणाकोणाला दिले याचा ‘व्हाइट पेपर’ काढा, असे आवाहनच त्यांनी सरकारला दिले. रिव्हॉल्व्हरसारख्या अतिशय विद्ध्वंसक आणि घातक वस्तूचे लायसन्स निवडणुकीचे पॅम्प्लेट वाटल्यासारखे हे सरकार वाटत सुटले आहे. सरकारने 25 ते 30 लाख रुपयांना रिव्हॉल्व्हर लायसन्स दिल्याचा दावा देखील त्यांनी केला.

हेही वाचा – Nikhil Wagle : गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर आता…, वागळे हल्लाप्रकरणी दानवेंची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -