घरमहाराष्ट्रनागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल - गृहमंत्री

नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल – गृहमंत्री

Subscribe

राज्यातील कोरोनाची साखळ तोडण्यासाठी ब्रेक दी चैन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी संचारबंदीची ऐशीतैशी केली. यावरुन आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

कडक निर्बंध जरी घातले असले तरी काही आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागत आहे. प्रत्येकवेळी पोलीस कारवाई करतीलच असं नाही. पण जर कोणी कायदा, नियम मोडत असतील तर पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल. परंतु आम्ही पोलिसांना संयमाने परिस्थिती हातळण्यास सांगितलं आहे, असं वळसे पटील म्हणाले. यावेळ त्यांनी खाकी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही. जो कोणी असं कृत्य करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील वळसे पाटलांनी दिला.

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल गृहविभागाचे अधिकारी, राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, गृह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कशापद्धतीने तयारी केली आहे. काल दुपारपर्यंत कशाप्रकारे परिस्थिती राहिली याचा आढावा घेतला. हे जे निर्बंघ घातले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन झालं पाहिजे, असे आदेश त्यांना दिले आहेत, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. अत्यावश्यक सेवेमध्ये जी आस्थापनं नाहीत, परंतु ती खुली आहेत, अशांवर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -