घरताज्या घडामोडीUPSC, NDA परीक्षार्थ्यांनो परीक्षेला जाण्यापूर्वी या ७ गोष्टी जाणून घ्या

UPSC, NDA परीक्षार्थ्यांनो परीक्षेला जाण्यापूर्वी या ७ गोष्टी जाणून घ्या

Subscribe

युपीएससी मार्फत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

युपीएससी (संघ लोकसेवा आयोग) एनडीए (१) २०२१ ची परीक्षा एप्रिल १८ घेण्यात येणार आहे. युपीएससीची परीक्षा ४०० पदांसाठी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा लिखित स्वरुपात होणार आहे. देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु अवघ्या काहि दिवसांवर येऊन ठेपलेली संघ लोक सेवा आयोगाची परीक्षा ही प्रत्यक्षरित्या घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परंतु राज्यात कडक लॉकडाऊन असताना या परीक्षार्थ्यांनाही कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. भारतीय दल, वायुदल आणि नौदलात भर्ती करण्यात येणार आहे. युपीएससीची परीक्षा महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबईमध्ये घेण्यात येते. दोन्ही शहरांत कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

युपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना काही निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. युपीएससी मार्फत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मास्क घालणे

सर्व परीक्षार्थ्यांना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. मास्क आणि फेस कवर नसल्यास उमेदावाराला परीक्षा केंद्रात जाण्यास परवानगी मिळणार नाही. तसेच पडताळणी करण्याच्या वेळेस मास्क काढण्याची परवानगी असेल.

हॅन्ड सॅनिटाझर

सर्व परीक्षार्थ्यांनी आपले मास्क, हॅन्ड सॅनिटायझर(पारदर्शक बाटली असावी) सोबत आणायचे आहे.

- Advertisement -

सामाजिक अंतर राखणे

परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

आयडी, हॉल टिकेट सोबत ठेवणे

प्रत्येक परीक्षार्थ्यांनी आपले ओळखपत्र (आयडी कार्ड) सोबत ठेवावे तसेच आपले आधारकार्डही सोबत ठेवावे. जर ओळखपत्रावर उमेदवाराचा फोटो नीट दिसत नसेल तर अशा उमेदवाराने आणखी २ ओळखपत्रे सोबत ठेवावी जेणेकरुन कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही

काळ्या शाहीचा पेन सोबत बाळगावा

परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना आपल्याला लागणारा पेन सोबत ठेवावा, काळ्या शाहीचा पेन सोबत ठेवावा

परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचणे

परीक्षेच्या १० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार परीक्षेच्या वेळेच्या १० मिनिटांपूर्वी बंद करण्यात येणार आहे.

या गोष्टींवर बंदी असेल

कॅमेरा, मोबाईल आणि इतर गोष्टी परीक्षा केंद्रात नेण्यासाठी बंदी असेल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -