घरCORONA UPDATEMaharashtra Curfew News : रमजानमध्ये ५० हून जास्त लोकांना ५ वेळा...

Maharashtra Curfew News : रमजानमध्ये ५० हून जास्त लोकांना ५ वेळा नमाज करता येणार नाही, HC ने फेटाळली याचिका

Subscribe

लोकांच्या जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असे याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण म्हणजे रमजानचा महिना सुरु झाला आहे. रमजान महिन्यात नमाजासाठी दिवसातून ५ वेळा ५० पेक्षा जास्त जणांना नमाजाकरिता जमण्यासाठी मुस्लिम धर्मियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र मुंबई उच्च न्यायलयाने ही याचिका फेटाळली आहे. सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता ब्रेक द चेन (break the chain) या नावाने कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात पुन्हा एकदा कर्फ्यू (Maharashtra Curfew) लावण्यात आला आहे. त्यामुळे लोकांच्या जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असे याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रमजानसाठी काही नियमावली लागू केली आहे. नमाजासाठी मशिदीमध्ये गर्दी केली जाऊ नये असे नियमावलीमध्ये म्हटले आहे.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. त्याचप्रमाणे या काळात होणारे रोझे देखिल सुरु झाले आहेत. रमजानच्या महिन्यात कोरोनासाठी आखून दिलेले सर्व नियम पाळून, योग्य काळजी घेऊन मशिदीमध्ये ५० पेक्षा जास्त लोकांना दिवसातून ५ वेळा नमाजासाठी जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी याचिका दक्षिण मुंबईतील जुम्मा मशिद ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र राज्य सरकारकडून या याचिकेचा विरोध करण्यात आला. राज्यातील सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. राज्यात सर्व जण समारंभ हे साध्या पद्धतीने साजरे केले जावे असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. हे नियम सर्वांना सारखे आहेत यात कोणताही बदल केला जाणार नाही. रमजानसाठी ५ वेळा नामाजासाठी परवानगी देण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारची होती. उच्च न्यायालयाने देखिल ही याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.

- Advertisement -

राज्यात सध्या कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरण्यास सक्त मनाई आहे. राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्य सरकारने ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत कोरोनाचा वाढला संसर्क रोखण्यासाठी जे नियम आखून दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.



हेही वाचा – आता ५० नाहीतर केवळ २५ जणांच्या उपस्थित उरकावं लागणार लग्न; जाणून घ्या नवे नियम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -