घरमहाराष्ट्रतिवरे धरण दुर्घटना : २० जणांचे मृतदेह सापडले; ३ जण अजूनही बेपत्ता

तिवरे धरण दुर्घटना : २० जणांचे मृतदेह सापडले; ३ जण अजूनही बेपत्ता

Subscribe

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती. आज पाचव्या दिवसापर्यंत धरणातून १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती एनडीआरएफ या शोध पथकाने दिली आहे.

तिवरे धरणात सलग पाचव्या दिवशी शोधकार्य सुरू असून रविवारी एनडीआरएफच्या पथकाने आणखी एक मृतदेह धरणातून बाहेर काढला आहे. त्यामुळे तिवरे धरण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या २० जणांचे मृतदेह सापडले असून अजून ३ जण बेपत्ता आहेत.

- Advertisement -

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती. आज पाचव्या दिवसापर्यंत धरणातून १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती एनडीआरएफ या शोध पथकाने दिली आहे. तर अजून ४ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तिवरे धरण फुटून त्याच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेली होती. तेव्हापासून धरणात वाहून गेलेल्यांचे शोधकार्य एनडीआरएफ पथकाकडून सुरू होते. तिवरे धरण फुटून ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये त्याचे पाणी शिरले. या गावाची अंदाजे लोकवस्ती ३ हजार इतकी आहे. यामध्ये आतापर्यंत २४ जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली होती. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेली होती.

सरकारकडून पाच लाखाची मदत जाहीर 

दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच चार महिन्यात घरे बांधून देणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली. धरणाची डागडूजी करण्यात आल्याची माहिती यांनी गिरीश महाजन यांनी यावेळी दिली असून दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आयएएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले. तसेच या धरणातील गळती होत आहे, अशी वारंवार तक्रार येत असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून संबंधितांवर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -