घरमहाराष्ट्रपश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशहून महाराष्ट्रात येणाऱ्यांना RTPCR सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशहून महाराष्ट्रात येणाऱ्यांना RTPCR सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

Subscribe

देशात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनेक राज्य़ांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. यामुळे इतर ठिकाणाहून राज्यात होणारा कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना संवेदनशील आपत्तीचे ठिकाण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना RTPCR ही चाचणी करणे सक्तीचे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

याबाबतचा आदेश महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जाहीर केला आहे. या आदेशात म्हटले की, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल हे कोरोना उत्पत्तीची संवेदनशील राज्ये आहेत. त्यामुळे या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना आता RTPCR चाचणी निगेटीव्ह असल्याचे जाहीर करणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

इतर राज्यांतून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये कोरोना उत्पत्तीची संवेदनशील जागा असल्याचे राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता पुढील आदेश येईपर्यंत ही दोन्ही राज्ये उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे मानली जाणार आहेत. तसेच या ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेली एसओपी लागू असणार आहे. त्यांना प्रवेशापूर्वी 48 तास आधीचा निगेटिव्हआरटीपीसीआर रिपोर्ट दाखवूनच राज्यांत प्रवेश मिळणार आहे.

यापूर्वी ‘ही’ 6 राज्ये ‘Sensitive Origin’ घोषित

काही दिवसांआधी महाराष्ट्राने राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, केरळ, उत्तराखंड या राज्यांना उत्पत्तीची संवेदनशील राज्ये म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आता उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही sensitive origin म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसर आहे. त्यामुळे या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग अधिक वाढू नये यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -