Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी वाहतूक नियम मोडण्यात राजकीय नेते अग्रेसर; उपमुख्यमंत्र्यांनी भरला 27,800 रुपयांचा दंड

वाहतूक नियम मोडण्यात राजकीय नेते अग्रेसर; उपमुख्यमंत्र्यांनी भरला 27,800 रुपयांचा दंड

Subscribe

वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताचा फोटो काढून त्याच्यावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सरकारचे नियम आणि सामान्य नागरिक यांचे कधीच जुळल्याचे पाहायला मिळत नाही. परंतु, आता राजकीय नेत्यांचेही सरकारच्या नियमांशी जुळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्यांना वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक करावाईला सामोरे जावे लागते. परंतु, पोलीस आणि वाहन चालक यांच्यात होणारे वाद कमी करण्यासाठी सरकारने इ-चलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताचा फोटो काढून त्याच्यावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सरकारचे नियम आणि सामान्य नागरिक यांचे कधीच जुळल्याचे पाहायला मिळत नाही. परंतु, आता राजकीय नेत्यांचेही सरकारच्या नियमांशी जुळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच आता राजकीय नेतेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात अग्रेसर असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने कारवाई करण्यात आली आहे.

नेहमीच सर्वसामान्यांना सल्ले देणारे, मार्गदर्शन करणारे जिल्ह्यातील नेते, मंत्री आणि आमदारांच्या वाहनांनीच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्ह्यात सर्वाधिक वाहने वापरणारे आमदार सुनील शेळके वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांना, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, कायद्याने घालून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नका, स्वत:सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, अशा अनेक सुचना हे नेतेमंडळी वारंवार देताना पाहायला मिळतात. मात्र आता या राजकीय नेत्यांनीच वाहतूक नियम न पाळल्याने सर्वसमान्य नागरिकांवर कारवाई होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.

वाहतूक नियम तोडण्यात सर्वाधिक आघाडीवर महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. अजित पवारांच्या दोन्ही वाहनांवर 27,800 रुपयांचा दंड असून, त्यांनी ही सर्व रक्कम नुकताच ऑनलाईन भरली. सर्वाधिक 14,200 रुपये दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना 5,200 रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – वीज निर्मितीकरिता कोळसा वाहतुकीसाठी ‘या’ प्रवासी गाड्या रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -