घरदेश-विदेशसुबोध जयस्वाल दिल्लीचे पोलीस आयुक्त होणार?

सुबोध जयस्वाल दिल्लीचे पोलीस आयुक्त होणार?

Subscribe

संजय पांड्ये यांची लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती होण्याची शक्यता आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सुबोध जयस्वाल यांची २८ फेब्रुवारी रोजी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, दत्ता पडसलगीकर यांची त्या जागी वर्णी लागल्यामुळे सुबोध जयस्वाल यांना राज्य पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आलं. मात्र, आता त्यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होऊ शकते. दिल्लीचे विद्यमान पोलीस आयुक्त अमूल पटनायक येत्या ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. त्या पदासाठी जयस्वाल यांच्यासोबतच दिल्लीचे पोलीस महासंचालक एन. एन. श्रीवास्तव यांचे देखील नाव चर्चेत आहे.

सुबोध जयस्वाल यांनी याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देखील कारभार सांभाळला होता. मात्र, दत्ता पडसलगीकरांच्या नियुक्तीमुळे त्यांचा राज्यात यावं लागलं होतं. पण आता सेवाज्येष्ठतेनुसार जयस्वाल यांचीच दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता अधिक आहे. सुबोध जयस्वाल यांना केंद्रीय संस्थांमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. रॉ आणि आयबीमध्ये जयस्वाल यांनी १० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं आहे. ते १९८५च्या बॅचचे अधिकारी आहेत. दिल्लीत सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असून त्यातच ही नियुक्ती करायची असल्यामुळे त्याची रीतसर परवानगी गृह मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे मागितल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसांमध्येच यासंदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दिल्लीत आव्हानांचा सामना

दिल्लीमध्ये सध्या अनेक समस्यांनी डोकं वर काढलं आहे. जेएनयूमधील वाद, सीएए-एनआरसीविरोधात सुरू असलेलं आंदोलन, मोर्चे, पोलिसांचा मारहाणीत असलेला सहभाग या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे दिल्लीमधली ही आव्हानं पेलण्यासाठी कुणाची नेमणूक होणार? याची मोठी चर्चा सुरू आहे.

राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण?

दरम्यान, सुबोध जयस्वाल प्रतिनियुक्तीवर दिल्लीत गेल्यास सध्या होमगार्डमध्ये पोस्टिंगवर असलेले संजय पांड्ये सेवाज्येष्ठतेनुसार राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर बसण्याची शक्यता आहे. आपल्या शिस्तप्रिय आणि कार्यक्षम कारकिर्दीसाठी पांड्ये ओळखले जातात. त्यांच्यासोबतच डी. कनकरत्नम, के. व्यंकटेशन, हेमंत नगराळे यांची देखील नावं चर्चेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -